चाळीसगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील तहसिल कार्यालयातील लाचखोर फौजदारी लिपीक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला आहे. दीपक बाबूराव जोंधळे असे या लाचखोराचे नाव आहे. त्याला २५०० रुपयाची लाच घेतांना एसीबीने रंगेहात पकडले. यामुळे तहसिल कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.
या कारवाईबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्या मध्ये मेहुनबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी त्यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी दीपक जोंधळे यांनी २५०० रुपयाची लाचेची मागणी करून सदर रक्कम ही पंचांसमक्ष स्विकारली आहे. आलोसे यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचेचा यशस्वी सापळा कारवाई
लाचखोराचे नाव – दीपक बाबूराव जोंधळे, वय- ४७ वर्ष, पद – फौजदारी लिपिक (दंडप्र) तहसील कार्यालय, चाळीसगाव जि. जळगाव,
लाचेचे कारण
यातील तक्रारदार यांचे पक्षकारांविरुद्ध दाखल गुन्ह्या मध्ये मेहुनबारे पोलीस स्टेशन कडून प्रतिबंधक कारवाईचा प्रस्ताव तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी चाळीसगाव यांच्याकडे सादर करण्यात आला होता. सदर प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण दाखल करून त्यामधील आरोपी त्यांना पुढील तारीख न देता जामिनावर मुक्त करण्याकरिता मदत करण्यासाठी यातील आलोसे यांनी २५०० रुपयाची लाचेची मागणी करून सदर रक्कम ही पंचांसमक्ष स्विकारली आहे. आलोसे यांचे विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
*सापळा अधिकारी –
अभिषेक पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.
*सापळा पथक –
पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, गायत्री पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पथक.
Chalisgaon ACB Raid Trap Bribe Corruption Tehsil Office Crime Money