मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झी मराठीवरील अनेक कार्यक्रम लोकप्रिय आहेत, त्यापैकीच एक म्हणजे धमाल कॉमेडी कार्यक्रम चला हवा येऊ द्या गेल्या सात वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता अधिकाधिक वाढताना दिसत आहे. तब्बल आठ वर्षानंतर आज हवा येऊ द्या च्या टीमसाठी एक स्पेशल दिवस असल्याचं समोर येत आहे.
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग म्हणजे आयुष्यात असणारा सर्व त्रास विसरण्याची प्रत्येक वेळी मिळणारी एक नवी संधी. कार्यक्रम सुरु झाला त्या क्षणापासून भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या आणि अशा बऱ्याच कलाकारांनी ‘चला हवा येऊ द्या’ ला घराघरात पोहोचवण्याचं काम केलं. श्रेया बुगडे या अभिनेत्रीने यासंदर्भात एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना थुकरटवाडी टीमबद्दलची ही गुड न्यूज शेअर केली आहे.
तब्बल आठ वर्षांनी चला हवा येऊ द्या टीमचा एका नव्या वास्तूत श्री गणेशा होताना दिसणार आहे. या निमित्ताने सगळी टीम आज एकत्र आली असून त्यांनी गणपती बाप्पाचं नाव घेत शूटिंगला नव्या वास्तूमध्ये सुरुवात केल्याचं श्रेयाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसून येत आहे. श्रेया या पोस्टमध्ये असं म्हणते, “तब्बल ८ वर्षांनी नव्या वास्तूत आजपासून थुक्रटवाडी चा श्री गणेशा!!! तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या नेहेमीप्रमाणे…”
हात रंगवायच्या ऐवजी तोंडच रंगवून ठेवलं. #ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/zbIv2P2HU7— Zee Marathi (@zeemarathi) July 27, 2022
चला हवा येऊ द्या कार्यक्रमाची टीम कायमच धमाल आणताना दिसत असते. मालिकेतील कलाकार एकाहून एक सरस विनोदाची बॅटिंग करून दर एपिसोडमध्ये कहर करताना दिसत असतात. गेल्या अनेक वर्षात सगळ्याच कलाकारांची भट्टी एकदम छान जमली असून त्यांच्यात ऑन आणि ऑफ स्क्रीन बरीच धमाल सुरु असते. खरे म्हणजे ‘कसे आहात मंडळी, हसनाय ना, हसायलाच पाहिजे’ असं म्हणत गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाला तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं आहे. या कार्यक्रमातील विनोदवीरही तितकेच प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात.
या कार्यक्रमाद्वारे भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे हे कलाकार प्रसिद्धी झोतात आले आहेत. या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने सर्व प्रेक्षकांना एक गुडन्यूज दिली आहे.
श्रेया बुगडे हे छोट्या पडद्यावरील आणि चित्रपटसृष्टीतील खासकरून मराठी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ती एक अष्टपैलू अभिनेत्री आहे आणि सध्या झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’मध्ये एकमेव महिला प्रमुख म्हणून काम करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रेया बुगडे मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. श्रेयाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया सगळ्यामुळेच श्रेया प्रेक्षकांची प्रचंड लाडकी बनली आहे.
श्रेया बुगडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची संपूर्ण टीम पाहायला मिळत आहे. त्यासोबत हे सर्वजण ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करताना दिसत आहे. तसेच ‘चला चला चला…हवा येऊ द्या’ असेही ते यात बोलताना दिसत आहे.
या व्हिडीओला श्रेयाने हटके कॅप्शन दिले आहे. तिची ही पोस्ट आणि तो व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे प्रचंड चाहते आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ मधील ही सर्व मंडळी पुन्हा प्रेक्षकांसमोर काय नवीन घेऊन येणार? याची चर्चा सुरू आहे.
७ दिन में डिलिव्हरी कॅन्सल हो सकता है. #ChalaHawaYeuDya #CHYD #EntertainmentchaDhamaka #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXxXD38 या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/03Q6DXoBUh— Zee Marathi (@zeemarathi) July 27, 2022
Chala Hava Yeu Dya Fame Actress Shreya Bugde Post Viral Zee Marathi TV Serial