पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या (CGST) पुणे-II आयुक्तालयाच्या वसुली अधिकाऱ्यांनी, इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवणे आणि ते चालवून घेण्यासाठी बनावट पावत्या तयार करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या बनावट पावत्यांची अंदाजे रक्कम २५ कोटी रुपये इतकी आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा लाभ घेण्याच्या आणि वापरण्याच्या उद्देशाने वस्तूंची कोणतीही नेआण केल्याशिवाय या बनावट पावत्या जारी केल्या गेल्या.अशा आठ बनावट कंपन्या/खोट्या कंपन्यांचा प्रारंभिक शोध लागला असून त्यापैकी सहा पुण्यातल्या आहेत.फसवणूक केलेल्या करांच्या रकमेचे स्वरूप आणि फसवणूक करणाऱ्या कंपन्यांच्या प्रादेशिक व्याप्तीचे मूल्यांकन केले जात आहे.
पुण्यातील रहिवासी असलेल्या या संघटीत टोळीचा सूत्रधार असलेल्या तीन आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.ज्या कंपन्यांनी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC) लाभ घेतला आहे त्यांच्याकडून पुढील तपास आणि वसुलीची कारवाई सुरू आहे.
यात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, CGST पुणे-II आयुक्तालयाद्वारे पुणे आणि जवळपासच्या भागात सक्रीय असलेल्या एकाधिक बनावट GST इनव्हॉइसिंग आणि बनावट ITC पेडलिंग संघटित टोळीशी संबंधित नऊ जणांना गेल्या सोळा महिन्यांत अटक करण्यात आली आहेत.बनावट आयटीसीच्या धोक्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हा विभाग कटिबद्ध असून ते त्याच्या कायदेशीर थकबाकी देणाऱ्या कंपन्यांची यामुळे फसवणूक होते आणि खऱ्या करदात्यांवर यामुळे अन्याय होतो आणि अर्थविभागाचे नुकसान होते.