मुंबई – अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परिक्षा रद्द केली आहे. हा निकाल देतांना उच्च न्यायालयाने काही प्रश्नही उपस्थितीत केले आहे. राज्यात अजुनही कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठलेले नसल्यामुळे २१ ऑगस्टला तुम्ही सीईटी कशी घेणार ? असेही विचारले आहे. राज्य सरकारने निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आयसीएससीच्या विद्यार्थिनीने ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायलायने हा निकाल दिला आहे. या याचिकेत पत्की यांनी राज्य सरकारने अकरावी प्रवेशाबाबत परिपत्रक जाहीर केले आहे त्याला स्थागिती देण्याची मागणी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निकाल देत सीईटी परिक्षा रद्द केली व २८ मे चा राज्य सरकारचा अध्यादेश रद्द केला. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश दिले आहेत. राज्यात २० लाख विद्यार्थी १० उत्तीर्ण झाले आहे. त्यात १६ लाख एसएससी बोर्डाचे आणि सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे मिळून ४ लाख विद्यार्थी आहे. त्यामुळे या सर्वांना या निकालाचा फायदा होणार आहे.