पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण जगात तीन वर्षांपासून असलेले संकट भारताही अजून संपलेले नाही आणि याच दरम्यान तापाशी संबंधित एक नवीन आजार मंकीपॉक्स समोर आला आहे. आता त्यावर संशोधन सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कांजिण्यावरील लस मंकीपॉक्सवर प्रभावी ठरू शकतात. ही लस मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्यानाच दिली जावी असेही डब्लूएचओने म्हटले आहे.
कोरोनानंतर आता मंकीपॉक्सने जगभरात खळबळ माजविण्यास सुरुवात केली आहे. भारतात कमी फरकाने चार रुग्ण सापडले आहेत. एक तर शिमल्याला जाऊन पुन्हा दिल्लीतील स्वगृही परतला होता. यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. अशातच मंकीपॉक्सच्या लसीबाबत चर्चा सुरु झाली आहे.
संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून केरळला परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे देशभरात भीतीचे वातावरण असले तरी फारसे काळजी करण्याचे कारण नाही मात्र काळजी घेण्याची गरज आहे असे आरोग्य तज्ञांचे मत आहे. सध्या भारतातील मंकीपॉक्सच्या रुग्णांमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे आणि सरकारने हा आजार रोखण्यासाठी उपाययोजनांना वेग दिला आहे. कोरोना महामारीनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंकीपॉक्स रोगाचा विषाणू ‘फ्लेविविरिडे विषाणू’ कुटुंबातून येतो आणि हा रोग माकडांपासून मानवांमध्ये पसरू शकतो. ज्याला ‘मंकी फिव्हर’ असे म्हणतात. मंकीपॉक्स हा प्राण्यापासून माणसात व त्यानंतर माणसापासून माणसात पसरू शकतो.
कोरोनावर लसीमुळेच विजय प्राप्त करता आला होता. यामुळे भारतीय फार्मास्युटिकल इंडस्ट्री या विषाणूजन्य आजारासाठी लस आणि औषधे विकसित करण्याचा विचार करत आहे. भारतात कोव्हिशिल्ड ही लस विकसित करण्यात सीरम इन्स्टिट्यूटचा मोठा वाटा होता. ब्रिटनच्या कंपनीने जरी ही लस बनविली असली तरी त्याच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या सीरमने घेतल्या होत्या. यानंतर ही विकसित झालेली लस भारतीयांना तसेच जगभरात पुरविण्यात आली होती.
सीरमचे अदर पुनावाला यांनी सांगितले की, त्यांचा जागतिक भागीदार नोवावॅक्ससोबत मंकीपॉक्सची एमआरएनए लस विकसित करण्याचा विचार सुरु आहे. याचबरोबर डेन्मार्कची कंपनी Bavarian Nordic द्वारे निर्मित स्मॉलपॉक्सची लस आयात करण्याचा देखील विचार सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कांजिण्यावरील लस मंकीपॉक्सवर प्रभावी ठरू शकतात. ही लस मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांनाच दिली जावी, असेही डब्लूएचओने म्हटले आहे.
डब्ल्यूएचओने सामुहिक लसीकरणाची शिफारस केलेली नाही. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर येथील मायक्रोबायोलॉजिस्ट आणि व्हायरोलॉजिस्ट, प्रोफेसर डॉ. गगनदीप कांग म्हणाले की, कांजिण्यांची लस मंकीपॉक्सपासून संरक्षण करते, परंतु कोणतीही भारतीय कंपनी स्मॉलपॉक्सची लस बनवत नाही. तसेच मंकीपॉक्सवर टेकोविरिमैट लस देण्याची शिफारस यूरोपीय मेडिसिन एजन्सीने केली आहे.
Serum Institute is Developing Vaccine for this Disease
Monkeypox Adar Poonawala