नाशिक – वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन कड़ून नवनियुक्त केंद्रीय स्वास्थ्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री पदाच्या माध्यमातून कोरोनामुक्तीसाठी करत असलेल्या कार्याचा World Book of Records, London कड़ून “Certificate of Commitment (Switzerland) देऊन गौरव करण्यात आला. World Book of Records चे यूरोप चे अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये करोनामुक्ती साठी जनजागृती केली जात आहे. तसेच कोरोना मुक्तीसाठी कार्य करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी Certificate of Commitment (Switzerland) ने व्यक्ती व संस्था ना सम्मानित करण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत World Book of Records, London चे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांनी नवनियुक्त केंद्रीय स्वास्थ्य राज्यमंत्री डॉक्टर भारती यांना नासिक मर्चेंट इंडस्ट्रीयल बँकेच्या सभागृहामध्ये Certificate of Commitment (Switzerland) ने सम्मानित केले. या वेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविदयालयाच्या नासिकच्या उप क्षेत्रीय प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी, ब्रह्माकुमारी पूनम दीदी उपस्थित होते.