विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. परिवहन विभागाचे मंत्री असलेल्या परब यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर घोटाळ्याचा आरोप परिवह विभागातीलच निलंबित अधिकाऱ्याने केला आहे. त्याची सध्या पोलिस चौकशी करीत आहेत. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आलिशान रिसॉर्टची गंभीर तक्रार केली आहे. यासंदर्भात सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडेही तक्रार केली आहे. त्याचीच दखल घेत केंद्रीय पथकाने परब यांच्या रिसॉर्टची पाहणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. दापोली येथील हे रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशातून उभारल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. केंद्रीय पथकाकडून पाहणी होणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले होते. त्यानंतर अधिकाऱअयांनी पाहणी केल्याचे सांगण्यात येत आहे. या पथकाने नक्की काय पाहणी केली, माहिती घेतली हे समजू शकले नसले तरी या पथकाच्या अहवालानंर केंद्र सरकार पुढील कारवाई करण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीच मोठ्या वादामुळे गृहमंत्रीपदाचा राजीनामा अनिल देशमुख यांना द्यावा लागला आहे. त्यात आता परब यांच्याविषयी वादाचे वारे वाहत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून महाविकास आघाडीला खिंडीत गाठण्यासाठी आणखी बळ मिळत आहे.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1403385252777582595