मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य रेल्वेकडून मनमाड – नांदगाव दरम्यान टाकण्यात आलेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गाची चाचणी करण्यात आली आहे. ती यशस्वी झाली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मार्गावर १३० किलोमीटर ताशी वेगाने मालगाडीचे चार डबे चालवून चाचणी घेण्यात आली.
२५ किलोमीटरच्या या तिसऱ्या लाईनचे काम विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. भुसावळ ते मनमाड असा १८३.९४ किलोमीटरचा हा प्रकल्प असून त्याचे ५२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामाची चाचणी पार पडली. तिसऱ्या रेल्वे लाइनवरून मालगाड्यांची वाहतूक होणार असल्याने मेन लाइनवरून धावणाऱ्या प्रवासी गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होईल. तसेच वेळेचीही बचत होणार आहे. म्हणजेच, अनेकदा मुंबईकडे जाणाऱ्या एक्सप्रेस विलंबाने धावतात. मनमाडच्या दरम्यानच त्यांना ताटकळत ठेवले जाते. मात्र, हा तिसरा मार्ग झाल्यानंतर प्रवासी गाड्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
Trial of Manmad Nandgaon 3rd railway line successful
Central Railway Manmad Nandgaon 3rd Line Successful
25.09 km of new 3rd line with electrification between Manmad-Nandgaon section is commissioned today 24/8/23 after a successful 130 kmph speed trial & inspection by Commissioner of Railway Safety With this, 183.94 km Bhusawal- Manmad 3rd line is now 53% completed