शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मध्य रेल्वेच्या १९ रेल्वेगाड्या तब्बल १४ दिवसांसाठी रद्द… तातडीने बघा ही यादी…

ऑगस्ट 10, 2023 | 4:20 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो



इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या सण उत्सवाचा कालावधी असून या काळात अनेक नागरिक आपापल्या गावी जात असतात किंवा देवदर्शनासाठी तीर्थस्थळी जातात तर काहीजण सुट्या घेऊन नातेवाईकांकडे जातात, यासाठी सर्वांनाच रेल्वे प्रवास हा सोयीचा वाटतो. परंतु रेल्वे विभागाने सध्याच्या दोन आठवड्याच्या काळात प्रवाशांची जणू काही गैरसोयच केली आहे. कारण या काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना रेल्वे ऐवजी आता अन्य वाहनांचा प्रवासासाठी उपयोग करावा लागणार आहे. कारण, मध्य रेल्वेच्या १९ रेल्वेगाड्या तब्बल १४ दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

म्हणून रद्द
रेल्वे विविध प्रकारच्या दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेत असते. साधारणतः मेगाब्लॉक शनिवार, रविवारी होत असतो. परंतु दीर्घ कालावधीसाठी म्हणजे दोन आठवड्याचा आठवड्याच्या काळात एखाद्या मार्गावरील रेल्वे सेवा बंद होण्याची अलीकडच्या काळात ही पहिलीच वेळ असावी. कारण दोन स्थानकादरम्यान रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई-हावडा मध्य रेल्वेच्या चौथ्या मार्गाला सक्ती रेल्वे स्थानकाशी जोडण्याचा तसेच या स्थानकाचे ‘यार्ड रिमॉडेलिंग’चे काम करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे दि. ९ ते २३ ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या तारखांना १९ रेल्वेगाड्या रद्द राहतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मुख्य मार्गावर सक्ती रेल्वेस्थानक आहे. या सक्ती रेल्वेस्थानकाचे पुनर्निर्माण आणि या स्थानकाशी चौथी मार्गिका जोडण्याची तयारी सुरू आहे.

दोन आठवडे असुविधा
नागपूर ते बिलासपूर आणि येथून झारसुगुडा या मार्गावर चौथा मार्ग टाकण्यात येत आहे. सध्या या मार्गाचे काम सुरू असून यातील काही विभागांमध्ये काम पूर्ण झाले आहे.या मार्गासोबतच त्यामध्ये गाड्यांची वाहतूकही सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाला हे काम पूर्ण करण्यासाठी १० ते २२ ऑगस्टपर्यंत म्हणजेच दोन आठवडयाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सहाजिकच मध्य रेल्वेच्या काही गाड्या १४ दिवस धावणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे. मात्र, प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने १० ते २२ ऑगस्ट दरम्यान सक्ती रेल्वे स्थानकाऐवजी जेठा पॅसेंजर हॉल्टवर गाड्या थांबविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बघा संपूर्ण वेळापत्रक
१) १४ ऑगस्ट १२८८० भुवनेश्वर – कुर्ला एक्सप्रेस.
२) १६ ऑगस्ट १२८७९ कुर्ला भुवनेश्वर – एक्सप्रेस.
३) १२ ऑगस्ट २०८२२ संत्रागाछी – पुणे एक्सप्रेस.
४) १४ ऑगस्ट २०८२१ पुणे-संत्रागाछी एक्सप्रेस.
५) १० ते २२ ऑगस्ट ०८७३८ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल
६) १० ते २२ ऑगस्ट ०८७३७ रायगड-बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.
७) ९ ते २२ ऑगस्ट ०८७३६ बिलासपूर – रायगड मेमू पॅसेंजर स्पेशल.
८) १० ते २३ ऑगस्ट ०८७३५ रायगड – बिलासपूर मेमू पॅसेंजर स्पेशल.
९) ९ ते २१ ऑगस्ट १८११३ टाटानगर – बिलासपूर एक्सप्रेस.
१०) १० ते २२ ऑगस्ट १८११४ बिलासपूर-टाटानगर एक्सप्रेस.

११) ९ ते २१ ऑगस्ट १८१०९ टाटानगर – इतवारी एक्सप्रेस.
१२) ९ ते २१ ऑगस्ट १८११० इतवारी – टाटानगर – एक्सप्रेस.
१३) ९ ऑगस्ट २०८२८ संत्रागाछी-जबलपूर एक्सप्रेस.
१४) १० ऑगस्ट २०८२७ जबलपूर-संत्रागाछी एक्सप्रेस.
१५) १० ऑगस्ट १७००५ हैदराबाद-रक्सौल एक्सप्रेस.
१६) १३ ऑगस्ट १७००६ रक्सौल-हैदराबाद एक्सप्रेस.
१७) ११ ऑगस्ट २२८४३ बिलासपूर-पाटणा एक्सप्रेस.
१८) १३ ऑगस्ट २२८४४ पाटणा-बिलासपूर एक्सप्रेस.
१९) १० ते २२ ऑगस्ट ०८८६१/०८८६२ गोंदिया – झारसुगुडा मेमू पॅसेंजर स्पेशल बिलासपूर आणि झारसुगुडा दरम्यान धावणारी रेल्वे गाडी यांचा समावेश आहे.

central railway 19 Express cancelled 14 Days August Month
Passengers Patna Gondia Nagpur Vidarbha

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

Nashik Crime १) शहरातून दोन दुचाकी चोरीला २) जुगार खेळणाऱ्यावर कारवाई

Next Post

संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ… महात्मा गांधींचे नातू तुषार गांधींची पोलिसात धाव

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
sambhaji bhide

संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ... महात्मा गांधींचे नातू तुषार गांधींची पोलिसात धाव

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011