मुंबई – गणेश भक्तांसाठी मध्य रेल्वेने मोठी खुशखबर दिली आहे. मुंबईतून कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्यांची घोषणा केल्यानंतर आता रेल्वेनेही पुढाकार घेतला आहे. मध्य रेल्वे एकूण ४० विशेष रेल्वे गाड्यांची सेवा गणेशोत्सवात देणार आहे. त्यामुळे मुंबईहून कोकणात आणि कोकणातून पुन्हा मुंबईत येण्यासाठी भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमवर गेल्या वर्षी गणेशोत्सवावर विरजण पडले. यंदा मात्र, गणेश भक्तांना कोकणात जाण्याच्या आणि गणेशोत्सव साजरा करण्याच्या मोठ्या आशा आहेत. त्यात एसटी महामंडळ आणि मध्य रेल्वेने पुढाकार घेऊन भाविकांना उत्साहित केले आहे.
विशेष रेल्वेगाड्यांची विस्तृत माहिती अशी