शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

झारखंड राज्यात रांचीमध्ये नंदुरबारच्या धर्तीवर सेंट्रल किचन…

by India Darpan
डिसेंबर 27, 2024 | 5:45 pm
in संमिश्र वार्ता
0
c04903b2 9e05 42cc be1c 666e85494453

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्रात राबवलेला सेंट्रल किचनचा उपक्रम हा अत्यंत अनुकरणीय आणि प्रभावीपणे राबवला जात आहे, हा प्रयोग नंदुरबारच्या धर्तीवर झारखंड सारख्या आदिवासी बहुल राज्याची राजधानी रांची येथे राबवण्याचा मानस असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी व्यक्त केला आहे.

नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास प्रकल्प (नंदुरबार) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सेंट्रल किचनला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. जिल्हा नियोजन अधिकारी अंकुश काळे, सेंट्रल किचनचे व्यवस्थापक तसेच कर्मचारी यांच्यासह विविध संबंधित यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सेंट्रल किचन या योजनेचे कौतुक करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ म्हणाले, महाराष्ट्रात आदिवासी विकास विभागाने राबवलेल्या नंदुरबार येथील सेंट्रल किचन या योजनेबाबत आज जाणीवपूर्वक प्रत्यक्ष भेट देवून माहिती करून घेतली. एकाच स्वयंपाक घरातून शिजलेले अत्यंत स्वच्छ, आरोग्यदायी, पौष्टिक व उल्लेखनीय म्हणजे कडधान्येयुक्त अन्न आदिवासी आश्रम शाळांमधील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांना नाश्ता, दुपारचे व रात्रीच्या जेवणात उपलब्ध करून दिले जाते आहे. आदिवासी मुलांमधील पोषण आहाराच्या समस्येवर परिणामकारक व परिपूर्ण अशी ही सेंट्रल किचन ची संकल्पना आहे. शिजवलेले अन्न अगोदर ज्यांनी तयार केले आहे, ते अगोदर चाखतात त्यामुळे त्या अन्नातील अत्यावश्यक घटक व पौष्टिकता तसेच प्रमाणबद्धता एकप्रकारे प्रमाणित केली जाते. त्यामुळे सकस आहारासाठीची मिड डे मिल ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पनेतील स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्याच्या निकषांवर आधारित त्रिसुत्री येथे प्रत्यक्षात यशस्वी झाल्याचे दिसत असल्याचे यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. सेठ यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत संपूर्ण सेंट्रल किचन ची कार्यपद्धती जाणून घेतली. उपलब्ध यंत्रसामग्रीचा उपयोग करताना त्यातील अन्नधान्य व भाजीपाला यांची पौष्टिकता कशी जपली जाते, या बाबतचे बारकावेही त्यांनी जाणून घेतले. सेंट्रल किचनसाठी काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच तेथे तयार करण्यात आलेल्या सकस आहाराचा आस्वादही घेतला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईत सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स एक्झिबिशन….मोठ्या बँकांकडून मिळणार इन्स्टंट डिस्काउंट

Next Post

या व्यक्तींच्या हातून उल्लेखनीय कार्य घडेल, जाणून घ्या, -शनिवार, २८ डिसेंबरचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या हातून उल्लेखनीय कार्य घडेल, जाणून घ्या, -शनिवार, २८ डिसेंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011