नवी दिल्ली – केंद्र सरकारने सामान्य लोकांना घर बसल्या १५ लाख रुपये कमविण्याची संधी दिली आहे. ही सर्वांसाठी सुवर्णसंधी आहे. १५ ऑगस्टला एका स्पर्धेत भाग घ्यावा लागणार आहे. यातील विजेत्यांना दोन लाख रुपयांपासून ते १५ लाख रुपये जिंकण्याची संधी आहे. मोदी सरकारच्या या स्पर्धेत भाग घेऊन तुम्हाला लखपती होता येणार आहे.
केंद्राचे नियोजन
केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्राच्या पायाभूत सुविधांच्या आर्थिक तरतुदीसाठी विकास आर्थिक संस्था (डीएफआय) स्थापन करण्याची घोषणा केली होती. केंद्राने राष्ट्रीय पायाभूत यंत्रणा पाइपलाइन (एनआयपी) अंतर्गत २०२४-२५ पर्यंत सात हजारांहून अधिक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर १११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे.
सरकारची योजना
अर्थमंत्रालयाने नागरिकांकडून विकास आर्थिक संस्थेसाठी (डीएफआय) एक नाव आणि एक टॅगलाइन मागविली आहे. तसेच एक लोगो डिझाइन करण्याचे आवाहन केले आहे. वरील योजनेच्या भावनेचे प्रतिनिधीत्व करेल असा लोगो बनविणे अपेक्षित आहे.
नाव आणि टॅगलाइन कशी असावी
विकास आर्थिक संस्थेच्या स्थापनेच्या उद्देशाचे प्रतिनिधीत्व करणारे नाव, टॅगलाइन आणि लोगो बनविणे अपेक्षित आहे. डीएफआय नेमके काय करणार आहे किंवा काय करू शकते हे त्यातून दिसले पाहिजे. नाव आठवणे आणि त्याचा उच्चार करणे सोपे जाईल असे दृश्य हस्ताक्षराप्रमाणे बनविणे अपेक्षित आहे.
स्पर्धेत असा घ्यावा सहभाग
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तुम्हाला Mygov.in वर लॉगइन करावे लागेल. तिथे पार्टिसिपेट पर्यायावर क्लिक करावे. तुमची माहिती भरल्यानंतर तुमचा प्रवेश दाखल करावा. स्पर्धेसाठी नोंदणी आणि प्रवेश पाठविण्याची अखेरची मुदत १५ ऑगस्ट आहे. सर्वांच्या सल्ल्यांचे मूल्यांकन क्रिएटिव्ही, जीवंतपणा, विषयाशी जोडण्याच्या क्षमतेवर केले जाणार आहे. नागरिक आणि सर्व हितचिंतकांनी नव्या भारताची भावना प्रतिबिंबित करायला हवी.
बक्षीसाची रक्कम अशी
स्पर्धा तीन वेगवेगळ्या वर्गात घेतली जाईल. तिन्ही वर्गांसाठी बक्षीसाची रक्कम वेगळी आहे. जर तिन्ही वर्गांमध्ये तुम्ही पहिला क्रमांक मिळविला तर तुम्हाला १५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
वर्ग – पहिला क्रमांक – दुसरा क्रमांक – तिसरा क्रमांक
नाव – पाच लाख – तीन लाख – दोन लाख
टॅगलाइन – पाच लाख – तीन लाख – दोन लाख
लोगो – पाच लाख – तीन लाख – दोन लाख