विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कुठलं ही संकट आलं कि केंद्र सरकार कडे बोट करून आपली जवाबदारी ढकलणं हि आता महाराष्ट्र सरकार ची ओळख झाली आहे, अशी टीका केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केली.
“कोविड संक्रमणाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यात महाराष्ट्र सरकार प्रत्येक बाबतीत अपयशी ठरले आहे. आता जेव्हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडे कोणतीही योजना नाही, तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नैतिक जबाबदारीपासून दूर पळत केंद्र सरकार वर दोषारोप सुरू केले आहे” असेही दानवे म्हणाले.
भारत सरकारकडून सर्व राज्यांमधील सार्वजनिक आरोग्य सुविधा स्थापित करण्यासाठी 162 प्रेशर स्विंग एडसोर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांट च्या इंस्टॉलेशन ची मंजुरी जानेवारी २०२१ ला दिली होती.
मंजूर केलेल्या १६२ प्लांट्स मधून अश्या १० प्लांट्स च्या इंस्टॉलेशन ची मंजुरी केंद्र सरकारने महाराष्ट्र ला दिली होती. परंतु महाराष्ट्र सरकार ने या दिशेने कोणते ही कठोर पाऊले उचलली नाहीत.
“जानेवारी २०२१ ला हि मंजुरी दिली असून, या विषयावर युद्ध पातळीवर जर काम केलं असतं तर आज परिस्थिती वेगळी असती. इतकंच हा नाही तर, या संपूर्ण योजनेचा खर्च केंद्र सरकार वहन करणार आहे. त्यासोबत यामध्ये ७ वर्षा साठी लागणारा देखभाल खर्च देखील केंद्र सरकार देणार आहे. पण महाराष्ट्र सरकार कडून असे काहीही झाले नाही व यातूनच महाविकास आघाडी चा निष्काळजी पणा व बेजवाबदार पणा यातुन स्पष्टपणे दिसून येतो.” असेही दानवे म्हणाले.
आज केंद्र सरकार कडून मिळण्याऱ्या सर्व मदती मध्ये, महाराष्ट्र राज्याला मिळणारा वाटा सर्वात मोठा आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारत सरकार महाराष्ट्र राज्याला सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे.
महाराष्ट्राला सर्वाधिक 1784 मेट्रीक टन ऑक्सिजन दिले आहे तसेच महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी देखील केंद्र सरकारने दिली आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील, असे दानवे म्हणाले. भारत सरकारने दिलेल्या वचनानुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला रेमॅडेव्हिव्हिरचा देखील सर्वाधिक वाटा मिळतो आहे.
तसेच 25 एप्रिल, २०२१ रोजी, रुग्णालयांना ऑक्सिजनची उपलब्धता वाढविण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशानुसार PM CARES फंडाने देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील 551 समर्पित प्रेशर स्विंग अडसोर्पशन (पीएसए) मेडिकल ऑक्सिजन जनरेशन प्लांट्सच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला तत्वत: मान्यता दिली आहे.