नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठे फेरबदल राज्यपालांची खांदेपालट करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. एकाच वेळी देशातील आठ राज्यातील राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अशी आहे नियुक्ती
कर्नाटक – थावरचंद गहलोत
मिझोराम – हरिबाबू कंभमपती
मध्य प्रदेश – मंगूभाई छगनभाई
गोव – पीएस श्रीधरन पिल्लाई
त्रिपुरा – सत्तदेव नारायण आर्य
झारखंड – रमेश बैस
हरियाणा – बंडारु दत्तात्रेय
हिमाचल प्रदेश – राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर
……
यांच्या बदल्या
– मिझोरामचे राज्यपाल पी.एस. श्रीधरण पिल्लई यांच्याकडे गोव्याची धुरा
– हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची बदली त्रिपुरा येथे
– त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांना झारखंडची जबाबदारी
– हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय आता हरियाणाचे राज्यपाल
यांची राज्यपालपदी नियुक्ती
– केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती
– डॉ हरी बाबू कम्भाम्पती हे आता मिझोरामचे राज्यपाल
– मंगुभाई छगनभाई पटेल यांच्याकडे मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाची धुरा
– राजेन्द्र विश्वनाथ अर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती