नवी दिल्ली – केंद्र सरकारने कोविड महामारीमुळे येण्याजाण्यास निर्बंध लावल्यामुळे सरकारी कर्मचार्यांच्या रजा काळातील प्रवासी खर्च (एलटीसी) आणखी सोपा झाला आहे. सरकारने LTC special dispensation scheme ची मुदत वाढवून २५ सप्टेंबर २०२२ अशी केली आहे. या तरतुदीमुळे कर्मचार्यांना एलटीसी प्रावासासाठी खूप वेळ मिळणार आहे. योग्य नियोजन करून त्यांना प्रवास करू शकता येणार आहे.
राज्यसभेत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, सरकारी कर्मचार्यांना फायदा व्हावा हा LTC special dispensation scheme चा उद्देश आहे. जे कर्मचारी एलटीसीसाठी पात्र आहेत ते काही विशेष ठिकाणांवर कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकतात. अखिल भारतीय लेखा व लेखापरीक्षण समितीचे सरचिटणीस एच. एस. तिवारी यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. लॉकडाउनमुळे अनेक सरकारी कर्मचारी एलटीसीचा फायदा घेऊ शकले नाही. मुदतवाढ मिळाल्याने कर्मचार्यांना फिरायला जाण्याची संधी मिळणार आहे.
कुठे जाऊ शकतात फिरायला
फिरायला जाण्याच्या ठिकाणांमध्ये ईशान्य भारत, जम्मू काश्मीर, लडाख, अंडमान-निकोबार बेटसमुह या ठिकाणांचा समावेश आहे. यासाठी पात्र कर्मचारी खासगी विमान तिकिटावर प्रवास करू शकतात. सरकारी कर्मचारी दर ४ वर्षांत एलटीसीचा फायदा घेऊ शकतात.
कोणते कर्मचारी पात्र
केंद्रीय मंत्री म्हणाले, सरकारी कर्मचार्यांना Home Town LTC ला केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या प्रवासात रूपांतरित करण्याची अतिरिक्त संधी मिळणार आहे. जे कर्मचारी हवाई प्रवास करण्यास पात्र नसतील, त्यांनासुद्धा हवाई प्रवास करता येणार आहे. परंतु त्यांचा प्रवास सर्वसामान्य श्रेणी हवा. हा प्रवास दिल्ली, अमृतसर आणि जम्मू-काश्मीरसाठी असेल.
६० दिवसांचा एलटीसी
केंद्रीय मंत्री म्हणाले, एलटीसीचा फायदा पूर्ण सेवेदरम्यान फक्त ६० दिवसांच्या पगारी रजेवर मिळणार आहे. फिरायला गेल्यावर तिथे कोणताही अतिरिक्त खर्च आल्यास तो कर्मचार्यास करावा लागणार आहे. काश्मीरमध्ये सरकारी कर्मचार्यांच्या संरक्षणासाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. ते न घाबरता जम्मू-काश्मीरचा प्रवास करू शकतील.