नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे देशभरातील नागरिकांचा असंतोष वाढत असल्याने अखेर त्याची दखल केंद्रातील मोदी सरकारने घेतली आहे. त्यामुळेच दिवाळीच्या सणाचे निमित्त साधत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. दिवाळीचा सण आनंदी जावा यासाठी मंत्रालयाने एक निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, त्याची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजेच लक्ष्मीपूजनापासून केली जाणार आहे. उद्यापासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय अबकारी शुल्क कमी केले आहे. त्यामुळे लिटरमागे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारांनीही त्यांच्या अखत्यारीतील कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केला आहे.
https://twitter.com/ANI/status/1455912639205285895