नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे देशातील लाखो कर्मचार्यांच्या नोकर्या गेल्या आहेत. अशा कर्मचार्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार धावून आले आहे. कोरोना काळात नोकरी गेलेल्या कर्मचार्यांचा भविष्यनिर्वाह निधीचा हफ्ता आता केंद्र सरकारकडून भरण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यांनी ही घोषणा केली. याचा लाभ लहान उद्योगांमधील नोकरी गमावलेल्या कर्माचर्यांना होणार आहे.
निर्मला सीतारामण म्हणाल्या, लहान उद्योगांमधील कर्माचार्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली होती. नंतर कंपन्यांनी त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले. अशा कर्मचार्यांच्या कंपनी आणि कर्मचारी अशा दोघांचा भविष्यनिर्वाह निधीचा हफ्ता २०२२ पर्यंत केंद्र सरकार भरणार आहे. इम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) मध्ये नोंदणी असलेल्या कर्मचार्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.
परिस्थितीत सुधारणा
देशात रोजगाराच्या स्थितीत सुधारणार होत आहे. याचे संकेत ईपीएफओच्या सुधारित पेरोल डाटाच्या आधारावरून मिळत आहेत. श्रम मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जूनमध्ये १२.८३ लाख सदस्यांनी ईपीएफओमध्ये नोंदणी केलेली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्याचे एकूण १२.८३ लाख ग्राहकांपैकी एकूण ८.११ लाख प्रथमच ईपीएफओच्या सुरक्षेअंतर्गत आले आहेत. या महिन्यादरम्यान जवळपास ४.७३ लाख ग्राहक ईपीएफओकडून कव्हर केलेल्या प्रतिष्ठानांमधून नोकरी बदलल्यानंतर ईपीएफमधून बाहेर पडले आहेत. नंतर ते पुन्हा सहभागी झाले.