विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशातील कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये सतत होणारी वाढ लक्षात घेता केंद्र सरकारने सर्व वैद्यकीय पात्र कर्मचार्यांना तातडीने वैद्यकीय काम सुरू करण्यास किंवा फोनवर उपचारांचा सल्ला देण्यास परवानगी दिली आहे. तसेच कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की कर्मचारी ही कामे केवळ ड्युटी वेळेत न करता अन्य वेळेत मोफत करतील.
गृहमंत्रालयाच्या जुन्या आदेशाचा हवाला देत डीओपीटीने म्हटले आहे की, सध्याच्या कोरोना महामारीच्या वेळी केंद्र सरकारचे अनेक आरोग्य कर्मचारी फोनशी संबंधित उपचारांच्या सल्ला देण्याची विनंती करत आहेत.
कोविड -१९मधील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, संसर्गावर उपाय म्हणून सरकारमध्ये उपलब्ध असलेल्या क्षमतांचा उपयोग करण्यासाठी आणि जनतेला मदत करण्यासाठी, हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत असे ठरविले गेले आहे की, केंद्र सरकारच्या ज्या कर्मचार्यांकडे कोणत्याही वैद्यकीय उपचारपद्धतीची मान्यता आहे. त्यांना यापुढे वैद्यकीय कार्य करण्यासाठी किंवा फोनवर उपचारांचा सल्ला देण्यासाठी विभाग प्रमुखां कडून परवानगी घ्यावी लागणार नाही.
केंद्र सरकारच्या सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार याची अट अशी असेल. मात्र ही कामे विनामुल्य आणि सेवेच्या भावनेने ही कामे व्हावीत तसेच यामुळे सरकारी कर्मचार्याच्या अधिकृत कामात कोणत्याही प्रकारे अडथळा येऊ नये. तथापि, रेकॉर्डसाठी, सरकारी कर्मचार्यांना त्यांच्या विभागास या संदर्भात संपूर्ण माहिती द्यावी लागेल. हा आदेश तातडीने अंमलात येईल. त्यामुळे आता रुग्णांना फोनवर आरोग्योपचार मिळू शकतील.