मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुलै महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा असणार आहे. कारण सरकार कर्मचाऱ्यांवर सवलतींचा पाऊस पाडण्याची तयारीत आहे. कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याबरोबरच इतर बंपर गिफ्टही मिळणार आहेत.
जुलैमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना तीन बंपर गिफ्ट मिळणार आहेत. या गिफ्टमध्ये वेतनात वाढ करण्यात येणार असून थकबाकीही कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. शिवाय महागाई भत्त्यातही भरभक्कम वाढ करण्यात येणार आहे. यापूर्वीचा थकीत महागाई भत्तादेखील याच महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
थकलेल्या महागाई भत्त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारी व्यवस्थेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. याबरोबरच, भविष्य निर्वाह निधी खात्यातील व्याजाची रक्कमही सरकार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. कर्मचाऱ्यांना गेल्या १८ महिन्यांपासून महागाई भत्त्याची रक्कम मिळाली नव्हती. कोविडच्या कारणामुळे सरकारने ही रक्कम कर्मचाऱ्यांना दिली नव्हती. पण आता वातावरण निवळले असल्याने थकीत रकमांसह इतर सवलतीही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी थकबाकीविषयी सरकारकडे अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. जानेवारी २०२० ते जून २०२१ या एकूण १८ महिन्यांतील महागाई भत्ता सरकारने थकवला होता म्हणून ही नाराजी होती. याविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये सरकारकडून कोरोनाचे कारण देण्यात येत होते. आता मात्र कोरोनाचे आव्हान संपले असल्याने सर्व थकीत महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. याबरोबरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्येही वाढ करण्यात येणार आहे. ४ ते ५ टक्क्यांपर्यंत ही वाढ होऊ शकते.
Central Government Employee July Month Good News