पुणे – सध्याच्या काळात अनेक तरुण शासकीय नोकरीच्या शोधात आहे, कारण शासकीय नोकरीमध्ये चांगला पगार मिळतो. तसेच कायमस्वरूपी नोकरीची शाश्वती असते. सहाजिकच आणि तरुण स्पर्धा परीक्षेच्या मार्गांने सरकारी नोकरीच्या शोधात असतात. सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण सीबीआयमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे संस्थेतील विविध रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आमंत्रित केले आहे.
अधिकारी संवर्गातील विविध पदांसाठी 23 नोव्हेंबर 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत विशेष अधिकारी पदासाठी उमेदवारांची भरती होणार आहे. सध्या, या मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या सुमारे 115 जागा रिक्त आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती ही विविध शहरांच्या परीक्षा केंद्रांमध्ये घेतली जाईल. ऑनलाइन चाचणी दि. 22 जानेवारी 2022 रोजी अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, भोपाळ, चेन्नई, चंदीगड, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, पुणे, रायपूर आणि पाटणा केंद्रांवर होणार आहे, असे अधिकृत अधिसूचनेद्वारे सांगितले आहे. प्रस्तावित परीक्षेसाठी दिलेले केंद्र किंवा स्थळ कॉल लेटरद्वारे कळवले जाईल.
सेंट्रल बँकेत भरती परीक्षेद्वारे अर्जदारांची निवड केली जाईल. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट, centralbankofindia.co.in वर ऑनलाइन अर्ज भरू शकतात. अर्ज 23 नोव्हेंबर रोजी भरून झाल्यानंतर उमेदवारांना भरती परीक्षेला बसायचे की नाही हे संबंधित व्यवस्थापनाकडून ठरवले जाईल. तसेच कदाचित ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेची तारीख आता तात्पुरती आहे. कदाचित ती नंतर बदलली जाऊ शकते.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये या पदांवर अर्जदारांची भरती केली जाईल, यात आयकर अधिकारी, माहिती तंत्रज्ञान, डेटा सायंटिस्ट, क्रेडिट अधिकारी, डेटा अभियंता, आयटी सुरक्षा विश्लेषक, व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी, माहिती तंत्रज्ञान, कायदा अधिकारी, सुरक्षा अधिकारी आदी पदांचा समावेश आहे.
या तारखा लक्षात ठेवा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात- 23 नोव्हेंबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021
कॉल लेटर डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2022
परीक्षेची तारीख – 22 जानेवारी 2022