मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चिंता मिटली! मानसिक आरोग्यासाठी आता “किरण” हेल्पलाईन

by India Darpan
मे 8, 2021 | 12:38 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
images 2

विशेष प्रतिनिधी, पुणे
मानसिक आरोग्य पुनर्वसनासाठी किरण ही हेल्पलाईन केंद्र सरकारने सुरु केली आहे. ही हेल्पलाईन चोवीस तास असून देशातील १३ भाषांमध्ये तिची सेवा आहे. यामुळे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान मिळत आहे.
1800-500-0019 या टोल फ्री क्रमांकाद्वारे ही हेल्पलाइन कार्यरत आहे. मानसिक आजार असलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी आणि पाठिंबा दर्शविण्यासाठी ही सेवा आहे. विशेषत्वाने अलिकडे कोविड १९ महामारीच्या काळातील मानसिक आजाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन डीईपीडब्ल्यूडी, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
किरण हेल्पलाइनच्या माध्यमातून लवकर तपासणी, प्रथमोपचार, मानसिक सहायता, ताणाचे व्यवस्थापन, मानसिक तंदुरुस्ती, सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन देणे, मानसिक समस्येचे व्यवस्थापन इत्यादि उद्देशाने मानसिक आरोग्य पुनर्वसन सेवा दिली जाते.
ताण जाणवणे, काळजी, औदासिन्य, अस्वस्थतेतून येणारा झटका, समायोजन विकार, आत्महत्येचे विचार, महामारीमुळे निर्माण झालेल्या मानसिक समस्या आणि अत्यवस्थ मानसिक आरोग्याच्या काळात नागरिकांना सहाय्य करणे हा याचा उद्देश आहे. ही सेवा एखाद्या जीवनादायिनी प्रमाणे काम करते.
पहिल्या टप्प्यात सल्ला, समुपदेशन आणि १३ भाषांमध्ये वैयक्तिक पातळीवर, कुटुंब, बिगर शासकीय संस्था, पालकसंस्था, व्यावसायिक संस्था, पुनर्वसन संस्था, रुग्णालये किंवा कोणालाही देशभरात मदत हवी असल्यास ही हेल्पलाइन कार्य करेल. ज्या व्यक्तीला मानसिक आजार आहे, अशांच्या कुटुंबियांसाठी देखील ही हेल्पलाइन सहायभूत ठरत आहे.
बीएसएनएलशी तांत्रिक समन्वय राखून हा टोल फ्री क्रमांक दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस कार्यरत आहे. या हेल्पलाइनमध्ये ८ राष्ट्रीय संस्थांसह २५ संस्थांचा समावेश आहे. ६६० उपचार केंद्र, पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ आणि ६६८ मानसोपचारतज्ज्ञ यामध्ये कार्यरत असतील. हिंदी, आसामी, तामिळ, मराठी, ओडिया, तेलुगू, मल्याळम, गुजराती, पंजाबी, कन्नड, बंगाली, ऊर्दू आणि इंग्रजी या १३ भाषांचा हेल्पलाइनमध्ये समावेश आहे.
हेल्पलाइन अशे करते काम
भारताच्या कोणत्याही भागातून कोणत्याही दूरसंचार जाळ्यातून मोबाइल किंवा लँडलाईऩवरून टोल फ्री क्रमांक 1800-599-0019 जोडावा. स्वागत संदेशानंतर, योग्य बटण दाबून भाषेची निवड करावी, भाषेची निवड केल्यानंतर राज्य / केंद्रशासित प्रदेशाची निवड करावी, आपला फोन स्थानिक किंवा राज्यातील संबंधित हेल्पलाइन केंद्राशी जोडला जाईल. मानसिक आरोग्य तज्ज्ञ तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करतील किंवा बाहेरील (वैद्यकीय मानसोपचार तज्ज्ञ / पुनर्वसन ममानसोपचार तज्ज्ञ /  मानसशास्त्रज्ञ) यांचा संदर्भ /  संपर्क करून देतील.
तत्काळ तपासणी होणे, प्रथमोपचार, मानसशास्त्रीय आधार, तणावाचे व्यवस्थापन, मानसिक तंदुरुस्ती, विकृत वागणूक प्रतिबंधित करणे, मानसशास्त्रीय पेचाचे व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा संदर्भ उपलब्ध करून देणे, हे या हेल्पलाइनचे वैशिष्ट्य आहे.
चिंता, ऑबेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर (ओसीडी), आत्महत्या, औदासिन्य, अस्वस्थतेतून येणारे झटके, समायोजन विकार, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि सबस्टन्स अब्यूस हे मानसिक आरोग्याबाबतीत असलेल्या समस्या निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन समर्पित आहे. अडचणीतील लोकांना मदत, महामारीमुळे निर्माण झालेल्या मानसिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या अत्यवस्थ समस्या हेल्पलाइन पूर्ण करेल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भाजी

Next Post

कोरोनानंतर आता चीनी रॉकेटचा पृथ्वीला धोका; या देशांवर आज कोसळणार

India Darpan

Next Post
E0i4gTtWYAMhIuz

कोरोनानंतर आता चीनी रॉकेटचा पृथ्वीला धोका; या देशांवर आज कोसळणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011