नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एलटीटी मुंबई-जयनगर एक्स्प्रेसचे ११ डबे देवळाली कॅम्प – लहवित रेल्वे स्टेशनच्या मध्ये घसरुन भीषण अपघात रविवारी झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासानाने काम सुरु केले. सोमवारी हे काम जवळपास पूर्ण झाल्यानंतर दुपारी २.५५ वाजता डाऊन लाईन सुरक्षित रित्या दुरुस्त झाली. त्यानंतर 11055 LTT गोरखपुर गोदान एक्सप्रेस ही पहिली ट्रेन अप़घात स्थळाहून पास झाली आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने ट्विट करुन दिली आहे. त्यांचा व्हिडिओ सुध्दा त्यात टाकला आहे. तर बघा हा व्हिडिओ….
https://twitter.com/Central_Railway/status/1510913155995738112?s=20&t=tAQPZQexN7pJgJ3BX7dBVw