नवी दिल्ली – अन्न, वस्त्र, आणि निवारा म्हणजेच घर या मूलभूत गरजा मानल्या जातात. प्रत्येकालाच आपले स्वप्नातील एक घर असे वाटते. त्यासाठी प्रत्येक जण आयुष्यभर धडपड आणि धावपळ करत असतो. मात्र आता घराच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे, याला कारण म्हणजे सिमेंटच्या किमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
पुढील काही महिन्यांत सिमेंटच्या किरकोळ किमती पुन्हा 15 ते 20 रुपयांनी वाढू शकतात. कदाचित या आर्थिक वर्षात प्रति बॅग 400 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचू शकतात. कोळसा आणि डिझेलसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ आणि मागणीत झालेली वाढ हे किमती वाधारण्याचे कारण सांगण्यात येत आहे.
एका अहवालात म्हटले आहे की, किमती वाढल्याने सिमेंट उत्पादकांचे कर पूर्व उत्पन्न सुमारे 150 रुपयांनी प्रति टन कमी होईल. आयात कोळसा पहिल्या सहामाहीत वार्षिक 120 टक्क्यांनी आणि पेटकोकच्या किमतीत 80 टक्क्यांनी अलीकडील काळात वाढ यामुळे वीज आणि इंधनाच्या किमती 400 रुपये प्रति टन सुमारे 40 टक्क्यांनी वाढू शकतात. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात सिमेंट विक्री 11 ते 13 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत सर्वाधिक 3,831 मेगावॅट विजेची मागणी नोंदवली गेली. गेल्या दोन वर्षांतील नोव्हेंबर महिन्यात नोंदवलेल्या विजेच्या मागणीपेक्षा ही जास्त आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोंदवण्यात आलेली विजेची कमाल मागणी देखील दिल्लीत आतापर्यंतच्या कोणत्याही वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात नोंदवलेल्या कमाल मागणीपेक्षा जास्त आहे.
2019 आणि 2020 च्या तुलनेत दिल्लीत विजेची कमाल मागणी वेगाने वाढत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या वर्षी डिसेंबरमध्ये दिल्लीतील विजेची कमाल मागणी डिसेंबर 2019 आणि डिसेंबर 2020 मधील सर्वोच्च मागणीला मागे टाकून 5,400 मेगावॅटपर्यंत पोहोचू शकते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कमाल वीज मागणी 5,021 मेगावॅट होती, जी 2019 मध्ये 5,343 मेगावॅट होती. एकीकडे विजेची मागणी वाढत असल्याने त्यासाठी लागणारा कोळसा कमी पडत आहे दुसरीकडे सिमेंट कारखान्यांना पुरेशा वीज मिळत नाही असे दिसून येत आहे.