मुंबई – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ताब्यात आहे. या संदर्भातील न्यायालयाच्या सुनावणी प्रसंगी पालकांच्या वतीने शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी ही उपस्थित होती. विशेष म्हणजे ती शाहरुख खानची व्यवस्थापक म्हणून काम करत असली तरी प्रत्यक्षात ती त्याच्या कुटुंबातील सदस्यासारखी आहे. बॉलिवूड कलाकारांना सेलिब्रिटी बनवण्यात या व्यवस्थापकांचा मोठा हात आहे. त्यामुळे पूजा सध्या केवळ बॉलिवूडमध्ये नव्हे तर समाज माध्यमातही चर्चेत आहे.
पूजा ददलानी ही 2012 पासून ती शाहरुख खानसोबत काम करत असून पूजा शाहरुखचे चित्रपट शेडयुल, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि आयपीएल टीम, केकेआर कंपनी सांभाळते. पूजा ददलानी शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होती. ती खान कुटुंबाच्या खूप जवळची असून शाहरुख-गौरीसोबत अनेक खास प्रसंगी फोटो शेअर करत राहते. त्याचप्रमाणे अन्य सेलिब्रिटीचे मॅनेजर प्रसिध्दीच्या वलयात असतात.
करीना कपूर आणि तिची मॅनेजर पूनम दमानिया यांच्यात खास बॉन्डिंग आहे. करीना पूनमसोबत अनेकदा फोटो शेअर करत राहते. तसेच सेलिब्रिटी-मॅनेजर रिलेशनशिप व्यतिरिक्त त्या दोघींची खूप चांगली मैत्री आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत नाव कमावणाऱ्या प्रियंका चोप्राची मॅनेजर अंजुला आचारिया ही सध्या बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी मॅनेजर आहे.
अक्षय कुमारचा मॅनेजर झेनोबिया कोहला अनेक वर्षांपासून त्याच्यासोबत काम करत आहे. ती अक्षय कुमारचे व्यस्त वेळापत्रक हाताळते. सलमान खानचे मॅनेजर जॉर्डी पटेल हे सेलिब्रिटी मॅनेजर नाहीत, तर ते निर्माता आणि इव्हेंट मॅनेजर देखील आहे. रणवीर सिंगची मॅनेजर सुसान रॉड्रिग्स यशराज फिल्म्सची इन-हाउस सेलिब्रिटी मॅनेजर आहे. अनुष्का शर्माची व्यवस्थापक रितिका नागपाल ही तिचे सर्व व्यवसाय व्यवहार हाताळते. तर अर्जुन कपूरची व्यवस्थापक रुनाली भगत असून रुनाली सेलिब्रिटी मॅनेजर बनण्यापूर्वी फॅशन स्टायलिस्ट होती.