मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॉलिश करण्याच्या नावाखाली महिलांचे दागिने चोरुन नेणारी महिला सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. शहरातील हनुमानगर भागात जुने कपडे देऊन नवीन भांडी देणे तसेच दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच काम करणा-या एका महिलेने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने महिलांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेने अनेकांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे महिलेचा शोध घेत आहे.