नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोचिंग (खाजगी शिकवणी संस्था-केंद्र) क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध २०२४ अंतर्गत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सर्व कोचिंग सेंटर्सना ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे आणि त्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.या संदर्भात, सीसीपीएने ४९ नोटिसा जारी केल्या आहेत, २४ कोचिंग सेंटर्सना एकूण ७७.६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि त्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोचिंग सेंटर्सचे प्रतिनिधित्व अचूक, स्पष्ट असावे त्याचप्रमाणे दिशाभूल करणारे दावे किंवा ग्राहकांकडून महत्त्वाची माहिती लपवता कामा नये, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. तसेच कोचिंग सेंटर्सनी हमखास यशाची खात्री देणे टाळावे. कोचिंग सेंटर्सनी त्यांच्या जाहिरातींमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, श्रेणी आणि अभ्यासक्रमाचे तपशील लिहिणे तसेच त्या अभ्यासक्रमासाठी शुल्क भरल्याचा स्पष्ट उल्लेख यांसह इतर महत्त्वाचा तपशील द्यायलाच हवा. त्यासोबतच, जर एखादे अस्वीकरण लिहायचे असेल तर ते इतर महत्त्वाची माहिती लिहिलेल्या अक्षरांच्या आकारातच लिहावे लागेल जेणेकरून बारीक अक्षरातील मजकुरामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
आयआयटी-जेईई आणि नीट सारख्या परीक्षांच्या अलीकडेच जाहीर झालेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर सीसीपीएने असे निरीक्षण नोंदवले आहे की कोचिंग सेंटर्स कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्व, २०२४ चे पालन करत नाहीत. हा कायदा आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीसीपीए ने अलीकडेच काही कोचिंग संस्थांना खालील कारणांवरून नोटिसा बजावल्या आहेत: