नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच दहावी आणि बारावी टर्म-2 परीक्षांमध्ये होम सेंटर रद्द करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. यासाठी बोर्ड प्रवेशपत्रही जारी करेल. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेशपत्र जारी केले जातील. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्राची माहिती मिळेल. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने सीबीएसई बोर्डाने 10वी आणि 12वी टर्म-1 परीक्षेसाठी होम सेंटर बनवले होते. त्याचबरोबर अनेक शाळांना होम सेंटरपासून वेगळे ठेवण्यात आले होते. कारण ज्या शाळांमध्ये होम सेंटर नव्हते. तेथील विद्यार्थ्यांनी इतर शाळांमध्ये जाऊन परीक्षा दिली होती. आता कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत, त्यामुळे टर्म 2 मध्ये बोर्डाने होम सेंटर रद्द केले.
CBSE बोर्डाच्या मते, बिहारमध्ये 1 लाख 10 हजाराहून अधिक उमेदवार इयत्ता 10वीला बसतील. तर बारावीसाठी सुमारे 70 हजार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित परीक्षा केंद्रे तयार केली जातील. त्याचबरोबर टर्म 2 च्या परीक्षेत कोरोना मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करावे लागेल. एका वर्गात 20 विद्यार्थी बसतील. दोन बेंचमध्ये दोन ते तीन फूट अंतर ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे परीक्षेपूर्वी प्रत्येक खोलीची स्वच्छता केली जाईल. दरम्यान, बोर्डाचे परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज यांनी सांगितले की, परीक्षा होम सेंटरवर घेतली जाणार नाही. सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. बोर्डाने इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 2 च्या परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. दि. 26 एप्रिलपासून परीक्षा सुरू होणार आहेत.