नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई)च्यावतीने इयत्ता १२वी चा निकाल आज घोषित केला आहे. हा निकाल आज दुपारी २ वाजता जाहिर करण्यात आला. या निकाला संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार, बोर्डाने न्यायालयाला सांगितले होते की निकाल ३० जुलैच्या आत जाहिर केला जाईल. आज ३० जुलै असल्याने बोर्डाकडून हा निकाल घोषित करण्यात आला आहे.
कोरोना संसर्गामुळे यंदा इयत्ता १२वीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा सीबीएसईने केली होती. तसेच, विद्यार्थ्यांचे १०वी, ११वी आणि १२वी या तिन्ही वर्षांचे एकत्रित मूल्यमापन करुन निकाल घोषित केला जाईल, असे सीबीएसईने स्पष्ट केले होते. त्यामुळे या निकालाबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी उत्सुकता होती. हा निकाल सीबीएसईच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे
https://twitter.com/cbseindia29/status/1420987502450470916