नवी दिल्ली – दहावीचा एसएससी बोर्डाला निकाल घोषित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सीबीएसई बोर्डाच्या निकालाकडे आहे. हा निकाल निकाल २० जुलै रोजी घोषित होण्याची शक्यता आहे. अद्यापर्यंत केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) ने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलली नाही. पण, विद्यार्थ्यांना याबाबत लक्ष ठेवण्याचे सांगितले जात आहे. हा निकाल घोषीत झाल्यानंतर तो cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in या वेबसाईटवर बघता येणार आहे.
सायंकाळपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. एसएससी बोर्डाप्रमाणेच राज्यात मोठ्या प्रमाणात सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी आहे. त्यामुळे त्यांची उत्सुकता वाढली आहे. हे निकाल आल्यानंतर सीईटी परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांनाही लवकरच अर्ज करता येईल. सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. ते सुध्दा आज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एसएससी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाचे निकाल कसे येतात ते महत्त्वाचे ठरणार आहे.