नवी दिल्ली – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली. तर १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आज परीक्षांसंदर्भात दुपारी १२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा रद्द तर बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करावी असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केले होते. तर इतर राजकीय पक्षांनी ही मागणी केली होती. त्यानंतर ही महत्त्वाची बैठक झाली. दिल्लीसह देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. तर १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.