विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षण माध्यमिक बोर्ड (सीबीएसई)च्या इयत्ता १२वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करायचे कसे आणि निकाल कसा लावायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात बोर्डाने एका समितीचे गठन केले आहे. ही समिती येत्या १० दिवसात त्यांचा अहवाल सादर करणार आहे. या समितीत १२ जणांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनावरच त्यांचे पुढील शैक्षणिक वर्षाचे प्रवेश निश्चित होणार आहेत. या समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यार्थ्यांचे निकाल घोषित केले जाणार आहेत. म्हणजेच, जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात हा निकाल घोषित होण्याची चिन्हे आहेत.