विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसईच्या इयत्ता १२वीच्या परीक्षेबाबत आज मोठा निर्णय झाला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक झाली. यंदा इयत्ता १२वी ची परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार आणि कोरोनाचा सध्या असलेला प्रादुर्भाव हे लक्षात घेता परीक्षा रद्द करण्यावर बैठकीत एकमत झाले. सध्या कोरोना संसर्गाने अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला आहे. सतत असुरक्षेच्या वातावरणात विद्यार्थी कशा परिक्षा देऊ शकतील, याविषयी बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोना संकटामुळे सीबीएसईची परीक्षा इतिहासात प्रथमच रद्द होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांवर असुरक्षितेची मोठी टांगती तलवार आहे. हे योग्य नाही. त्यामुळे आपण सर्वांच्या हिताचा निर्णय घेत आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1399726817104248832