विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनची (सीबीएसई ) दहावीची परीक्षा यंदा देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रद्द झाली. मात्र आता मुल्याकंन पद्धतीचा वापर करून प्रत्येक विषयातील 20 गुणांचे आंतरिक मूल्यांकन केले जाईल तर संपूर्ण वर्षभर घेण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या आधारावर 80 टक्के गुण दिले जातील. तसेच 20 जून रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करतील.
सीबीएसई परीक्षा नियंत्रक सन्याम भारद्वाज म्हणाले की, निकाल निश्चित करण्यासाठी शाळांना मुख्याध्यापकांच्या नेतृत्वात आठ सदस्यीय समिती गठीत करावी लागेल. परंतु शाळा मधील शिक्षकांदेखील हे सुनिश्चित केले पाहिजे की, त्यांच्याद्वारे देण्यात आलेले गुण मागील दहावीच्या बोर्ड परीक्षेत शाळेच्या कामगिरी अनुरुप आहेत. मूल्यांकनात पक्षपाती असणाऱ्यां शाळांना दंड आकारला जाईल किंवा त्यांची संलग्नता रद्द केली जाईल.
मंडळाने अधिकृत पत्रात म्हटले आहे की, दि. 20 जून रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर जाहीर होतील. यावेळी दहावीत सुमारे 21 लाख मुले आहेत. विशेष म्हणजे दहावीची परीक्षा कोरोना साथीच्या आजारामुळे रद्द झाली होती. अशा परिस्थितीत मंडळाने परीक्षेच्या निकालासंदर्भात मूल्यांकन धोरण आखले आहे. यानुसार युनिट टेस्ट, अर्धवार्षिक परीक्षा आणि प्री-बोर्ड परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार केला जाईल.
दहावीच्या प्रत्येक विषयाची परीक्षा 1OO गुणांची आहे. यामध्ये अंतर्गत मूल्यांकनानुसार शाळा 20 गुण देते, तर 80 गुणांची मुख्य परीक्षा असते. यामध्ये सीबीएसई वेबसाइटवर बहुतेक शाळांनी अंतर्गत मूल्यांकनांची माहिती अपलोड केली आहे. ज्या शाळांमध्ये अद्याप हे गुण अपलोड झाले नाहीत, अशा शाळांना ते 11 जूनपर्यंत अपलोड करावे लागतील.
बोर्डाच्या म्हणण्यानुसार आता परीक्षा रद्द झाल्यानंतर उर्वरित 😯 गुणांचे मूल्यांकन शाळांना करावे लागेल. यासाठी २०२०-२१ शैक्षणिक वर्षात शाळांकडून घेण्यात आलेल्या परीक्षांना आधार देण्यात येईल. यामध्ये 10 गुणांची युनिट टेस्ट, 3O गुण अर्धवार्षिक परीक्षा आणि 40 गुण पूर्व-बोर्ड परीक्षा असेल. प्रत्येक शाळेत निकाल तयार करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. यात शाळेचे मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांचा समावेश असेल. यात वेगवेगळ्या विभागातील पाच शिक्षक आणि जवळच्या शाळेचे दोन शिक्षक असतील. त्याचबरोबर शाळांना 25 मे पर्यंत निकाल तयार करुन 5 जूनपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा शुन्य निकाल येईल, किंवा निकालाबद्दल तत्कार असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन घेतल्या जातील, ज्यामध्ये सीबीएसईने जाहीर केलेल्या नमुन्या पेपरच्या आधारे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. या परीक्षेचेही मूल्यांकन केल्यानंतर शाळांना सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर गुण अपलोड करावे लागतील. जे विद्यार्थी बोर्डाने केलेल्या मुल्यांकनांशी सहमत नाहीत त्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. तथापि, त्या वेळी परिस्थितीवर अवलंबून असेल.