नवी दिल्ली – सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा होती. पण, याबाबबत अधिकृत तारीखही घोषीत केली गेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड होत होता. पण, आता CBSE बोर्डाने दहावीचा निकाल आज दुपारी १२ वाजता जाहीर केला आहे. याची माहिती CBSE च्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन देण्यात आली होती.
हा निकाल cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in येथे बघता येणार आहे.
CBSE Class X Results to be announced today at 12 Noon.#CBSEResults #CBSE pic.twitter.com/LJU1MUaB4Z
— CBSE HQ (@cbseindia29) August 3, 2021