एका निवेदनाद्वारे निशांक म्हणाले की, ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी बोर्ड परीक्षेच्या तारखांची घोषणा होईल. तथापि, कोरोनामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत बोर्डाची परीक्षा होणार नसल्याचे यापूर्वी सांगितले होते. सर्वसाधारणपणे या परीक्षा जानेवारीमध्ये सुरू होतात आणि लेखी परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होतात आणि मार्चमध्ये संपतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) या महिन्याच्या सुरूवातीला स्पष्टीकरण दिले होते की २०२१ च्या बोर्ड परीक्षा ऑनलाइन नसून लेखी घेतल्या जातील.
दरम्यान, सध्या कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बर्याच काळापासून बंद आहेत. तसेच मुलांना सर्वत्र ऑनलाईन वर्गातून शिकवले जात आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे लॉक डाऊन झाल्यानंतर देशभरात शाळा व महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद पडल्या. तेव्हापासून मुले जवळपास नऊ महिन्यांपासून घरून ऑनलाइन अभ्यास करत आहेत. त्यामुळे सीबीएसई बोर्डाशी संबंधित मुलांना कोठे आणि केव्हा परीक्षा घेण्यात येतील ? याची माहिती नव्हती, तथापि, काही दिवसांपूर्वी सीबीएसईने स्पष्ट केले होते की, परीक्षा ऑफलाईन असेल. परंतु शाळा बंद झाल्यामुळे मुलांचा अभ्यासक्रम ऑनलाईन अभ्यास अद्याप पूर्णपणे संपलेला नाही.