नवी दिल्ली – कोरोनाच्या प्रादुर्भावाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन येत्या फेब्रुवारीला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी ही माहिती दिली.
कोरोना संसर्गामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्याा परीक्षा घेऊ नयेत अशी विनंती असंख्य पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी केली होती. त्यावर अनेकदा सल्लामसलत केल्यावर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच घोषित केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचं हीत केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमावर असल्याचंही ते म्हणाले