मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण विभागाने जवाहरलाल नेहरू कस्टम हाऊस (जेएनसीएच), रायगड (महाराष्ट्र) च्या रोखे विभागाचे तत्कालीन अधीक्षक आणि गोरेगाव, ठाणे येथील दोन खाजगी कंपन्या तसेच अज्ञात इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने जेएनसीएचच्या अधिकार्यांसह जेएनसीएच, रायगड (महाराष्ट्र) च्या रोखे विभागात यापूर्वी संयुक्तपणे अचानक भेट दिली होती. खाजगी कंपन्यांशी संबंधित दोन बिल ऑफ एंट्रीच्या विरोधात ९ लाख ५६ हजार आणि ४ लाख ९६ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता आणि या दोन बिल ऑफ एंट्री अंतर्गत समाविष्ट वस्तू सीमाशुल्क गुप्तहेर विभागाने ठेवून घेतल्या होत्या.
दोन्ही खाजगी कंपन्यांनी अवाजवी फायदा घेऊन संबंधित अधीक्षक, रोखे विभाग, जेएनसीएच, रायगड आणि इतरांसोबत कट रचला आणि देय रक्कम न भरता या दोन बिल ऑफ एंट्री अंतर्गत समाविष्ट असलेल्या वस्तू दंड न भरता मिळवल्याचा आरोपही करण्यात आला. यामुळे सरकारी तिजोरीचे नुकसान झाले आहे . नवी मुंबई, नोएडा , सीतापूर, गोरेगाव आणि ठाणे येथे आरोपींच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. या प्रकरणात अधिक तपास अजून चालू असून मोठे रॅकेट बाहरे येण्याची शक्यता आहे.
CBI raids; A case has been filed against private companies along with the Superintendent of Customs
cbi raids private companies superintendent customs case Raigarh Raigad JNCH