नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली सरकारच्या शिक्षण खात्यात घोटाळा झाल्याचा संशयावरुन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. दिल्लीतल्या शाळांमध्ये २ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी सिसोदिया यांची चौकशी केली जात आहे.
सीबीआयकडून सध्या एकाच वेळी २० ठिकाणी छापमारी करण्यात येत आहे. याबद्दल स्वतः सिसोदिया यांनीच ट्विट करत माहिती दिली आहे. सिसोदिया यांनी एक ट्विट केलं असून, “सीबीआयचे आमच्या घरी स्वागत आहे. चौकशी दरम्यान आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करु, जेणे करून सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक केसेस करण्यात आल्या आहेत. पण त्यातून काहीही बाहेर आलेलं नाही. मला पूर्ण विश्वास आहे की या छापेमारीतूनही काहीच साध्य होणार नाही. मी मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. अन् त्याला कुणीही रोखू शकत नाही”, असं ट्विटमध्ये म्हणलं आहे. लाखो बालकांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करत असून, चांगल्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच आपला देश पहिल्या क्रमांकावर पोहचू शकत नाही, असेही सिसोदिया म्हणाले.
https://twitter.com/msisodia/status/1560462380437770243?s=20&t=zXKsJn_h9IdaMdYJmX3QoA
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही या प्रकरणावर ट्विट केलं आहे. दिल्लीचं शिक्षण मॉडेल आणि आरोग्यतील प्रगतीबाबत जगभर चर्चा होत आहे. दिल्लीची ही वाहवा लोकांना सहन होत नाही. दिल्लीची प्रगती, प्रशंसा त्यांना रोखायची आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या घरावर छापे टाकले जात आहेत. ७५ वर्षात चांगलं काम करणाऱ्यांची अडवणूक झाली त्यामुळेच देश मागे राहिला. पण आम्हाला मात्र आमच्या उद्दिष्टापासून कोणीही रोखू शकत नाही, असं केजरीवाल म्हणाले आहेत.
https://twitter.com/ArvindKejriwal/status/1560466426489581569?s=20&t=zXKsJn_h9IdaMdYJmX3QoA
भाजपने दिली ही प्रतिक्रीया
भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. सिसोदिया यांनी मागच्या काही दिवसात दिल्ली सरकारमध्ये राहून भ्रष्टाचार केला. ते आता समोर आलं आहे. भावनिक ट्विट करून ते लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं भाजपने म्हटलं आहे.
https://twitter.com/msisodia/status/1560462469155651584?s=20&t=zXKsJn_h9IdaMdYJmX3QoA
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी न्यूयॉर्क टाइम्सचे पहिले पान ट्विट केले
https://twitter.com/ArvindKejriwal/status/1560460394917167104?s=20&t=zXKsJn_h9IdaMdYJmX3QoA
CBI Raid on Delhi DYCM Manish Sisodia Home








