इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखाद्या भ्रष्ट अधिकारी किंवा राजकीय नेत्याने किंवा कोणत्याही भ्रष्टाचारी मार्गाने पैसे कमविणाऱ्या व्यक्ती च्या अपसंपत्तीबाबत कुणकूण लागताच सीबीआयच्या वतीने छापा टाकण्यात येतो. इतकेच नव्हे तर कडक कारवाई करीत जाप्तीची मोहिमे राबविण्यात येते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण (सीडीएससीओ) या संस्थेत कार्यरत एका औषध निरीक्षकाकडे त्याच्या उत्पन्न स्त्रोतापेक्षा तब्बल १५४ टक्के अधिक मालमत्ता सापडली आहे.
सीबीआयने या निरीक्षकाच्या घरी केलेल्या छापेमारीत १३ लाख ९० रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. या छापेमारीत औषध निरीक्षक आणि त्याच्या पत्नीच्या नावे विविध बँकांतील आणि सरकारी योजनांतील ठेवी, अशी एकूण ५२ लाख ९५ हजार ९७५ रुपयांची मालमत्ताही सापडली आहे. दरम्यान, सीबीआयकडून दुसऱ्या एका घटनेत अहमदाबाद आणि पुणे येथे सात ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि त्यादरम्यान अनेक दोषी दस्तऐवज, लेख, मालमत्तेची कागदपत्रे आणि 38 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले.
अहमदाबाद येथे औषध निरीक्षक आणि वैद्यकीय उपकरण अधिकारी या पदावर पराग गौतम हे कार्यरत आहे. त्याने व्यापारी जिनिश पटेल यांच्याकडून मालखरेदीसाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी पटेल यांनी सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर गौतम याला लाच स्वीकारताना अटक केली. गौतम याने घरातील स्वयंपाक सुविधांवर २३ लाख खर्च केले. इतकेच नव्हे तर, त्याच्या पत्नीच्या नावे उत्तर प्रदेश येथे भूखंड असल्याचे कागदपत्रांवरून दिसून आले, तर छाप्या दरम्यान १४ हजार १०० रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि ४ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही सापडले. या दागिन्यांच्या खरेदीचा कोणताही स्त्रोत गौतम याला सांगता आला नाही.
वार्षिक उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता गौतम याला अटक केल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी छापेमारी केली. या छापेमारीत त्यांना मोठे घबाड सापडले. या छापेमारीत गौतम आणि त्याच्या पत्नीच्या नावे विविध बँकांतील आणि सरकारी योजनांतील ठेवी अशी एकूण ५२ लाख ९५ हजार ९७५ रुपयांची मालमत्ता सापडली आहे. त्याच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा त्याच्याकडे सापडलेली मालमत्ताही सुमारे १५४ टक्के जास्त आहे. तसेच दुसऱ्या घटनेत काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने अहमदाबाद आणि पुण्यातील एका ‘स्टार्च’ उत्पादन कंपनीशी संबंधित नागरिकांच्या जागेवर छापे टाकले. यापूर्वी तपास यंत्रणेने तक्रारीवरून अहमदाबाद येथील या कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. या कंपनीवर 710.85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
CBI Raid Drug Inspector Corruption Money Found