नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआयने) बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. सीबीएयने दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबादसह 19 ठिकाणी छापे टाकले. जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (WAPCOS) चे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजिंदर कुमार गुप्ता यांच्या घरातून सीबीआयने तब्बल २० कोटींहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे.
उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याबद्दल राजिंदर कुमार गुप्ता यांच्यावर नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. राजिंदर कुमार गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयच्या पथकांनी त्यांच्या परिसराची झडती घेतली. ज्यामध्ये मालमत्ता आणि इतर मौल्यवान वस्तूंशी संबंधित कागदपत्रांव्यतिरिक्त २० कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले.
#BreakingNews | CBI ने आज 19 जगह छापा मारकर बरामद किए 20 करोड़ रुपये कैश, वैपकोस वाटर एंड पावर कंसल्टेंसी के पूर्व सीएमडी राजेंद्र कुमार गुप्ता के घर से बरामद हुए नोटों के बंडल। #CBI #BlackMoney #Corruption #Raid pic.twitter.com/Sz4jd40YvI
— India TV (@indiatvnews) May 2, 2023
CBI Raid 20 Crore Money Recovered Officers Home