इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना मध्य रेल्वे, नाशिक येथील वरिष्ठ विभाग अभियंता (गुणवत्ता तपासणी) यांना अटक केली आहे.
नाशिक येथील एका खासगी कंपनीच्या मालकाने खरेदी ऑर्डरविरुद्ध केलेल्या लाकडी पॅकिंग वेजेसच्या पुरवठ्याशी संबंधित गुणवत्ता तपासणी अहवाल देण्यासाठी आरोपी वरिष्ठ विभाग अभियंत्याने १५ हजार रुपयांची मागितल्याच्या तक्रारीवरून सीबीआयने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या कारवाईत सीबीआयने सापळा रचून ही कारवाई केली. तक्रारदाराकडून १५,००० रुपये स्वीकारताना आरोपी वरिष्ठ विभाग अभियंत्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर, आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली. यावेळी गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.