मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशी करणार आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्या १०० कोटी रुपयाची खंडणी वसुलीचे आरोपावरुन न्यायालयाने सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही चौकशी होत आहे. या चौकशीत परमबीर सिंग यांच्या आरोपांवरुन सीबीआय देशमुख यांना प्रश्न विचारणार आहे.
याअगोदर सीबीआयने देशमुख यांच्या दोन स्वीय सहायकांना चौकशी केली. त्यानंतर आात देशमुख यांची चौकशी होत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. त्यात त्यांनी देशमुख हे १०० कोटी रुपयाची खंडणी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्याचे राजकारणही तापले. विरोधी पक्षांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण, त्यांनी तो त्यावेळेस दिला नाही. पण, उच्च न्यालालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.