इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सीबीआय कोर्टाने लाचखोरीच्या प्रकरणात एअर इंडियाच्या मुंबईतील तत्कालीन डॉक्टरला ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची (आरआय) आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सीबीआय खटल्यांसाठी अहमदाबाद येथील विशेष न्यायाधीशांनी आरोपी डॉ. सुरेश मारोतराव भगतकर, एअर इंडियाचे तत्कालीन डॉक्टर यांना ही शिक्षा सुनावली.
CBI ने ३ जानेवारी २०११ रोजी लाचखोरी/भ्रष्टाचाराच्या आरोपावरून उपरोक्त आरोपींविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदवला होता. एअर इंडिया लि.ची उपकंपनी, एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सुरक्षा एजंट पदावर नियुक्तीसाठी आरोपीने एका व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली आणि मोबाईल फोनवर संभाषण करताना तक्रारदाराकडून बेकायदेशीर पैशाची मागणी केली.
आरोपी डॉ. सुरेश मारोतराव भगतकर याने आपल्या लाचेच्या मागणीचा पुनरुच्चार केला व मागितलेली रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले व त्यानंतर मागणी केलेली लाचेची रक्कम जमा करण्यासाठी त्याचा खाते क्रमांक पाठविला. आरोपीच्या निर्देशानुसार वरील खात्यात पाच हजार रुपये जमा करण्यात आले. तपास पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने ९ नोव्हेंबर २०११ रोजी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान, २७ फिर्यादी साक्षीदार तपासले गेले. खटल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून त्यानुसार शिक्षा सुनावली.