मुंबई – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने आज मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील तब्बल १२ शहरांमध्ये सीबीआयने छापेमारी केली आहे. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली या शहरांचा समावेश आहे. या छाप्यांसदर्भात अधिक माहिती समोर आली नसली तरी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित ही छापेमारी आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याप्रकरणी जी चौकशी सुरू आहे. त्याअंतर्गत अधिक तपासासाठी हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगर आणि मुंबई येथील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. तर, सहआयुक्त संजय पाटील यांच्या पुणे आणि सांगली या निवासस्थानी सीबीआयने विविध दस्तावेज तपासली. नाशिकमध्ये नक्की कुणाच्या घरी किंवा ठिकाणी छापे टाकले हे अद्याप समोर आलेले नाही. या छाप्यातून जी माहिती समोर येईल त्याआधारे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
https://twitter.com/ANI/status/1420304846519865347