इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) वाराणसी येथे दोन लाखाची लाच घेतांना रेल्वेच्या एका मोठ्या अधिका-याला अटक केली आहे. तक्रार आल्यानंतर दोन लाखाची लाच मागतांना CBIने १ ऑक्टोंबर रोजी आरोपी सीनियर DEN, NER, वाराणसी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
एका खाजगी कंपनीला दोन निविदा देण्यात आल्या होत्या. त्यांना लाचेची रक्कम न दिल्यास कामात अडथळा आणू व भविष्यात त्याचे बिल पास करणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यानंतर सीबीआयने सापळा रचून आरोपींना मागणी करताना व स्वीकारताना रंगेहात पकडले
या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला लखनौ येथील सीबीआय न्यायालय क्रमांक 3, विशेष न्यायाधीश यांच्या न्यायालयात हजर केले गेले. सीबीआयकडून आरोपींच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. तपास सुरू आहे.