इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ओडिशातील राउरकेला रेल्वे स्टेशन येथे एका पार्सल क्लर्कला तक्रारदाराकडून लाच घेताना अटक केली आहे.
सीबीआयने २१ ऑगस्ट रोजी सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी पार्सल क्लर्कने प्राधान्याने वस्तू बुक करण्यासाठी तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या घटनेची सीबीआयने दिलेली माहिती अशी की, आरोपी पार्सल क्लर्कने तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली आणि तक्रारदाराला लाचेची रक्कम मिळावी यासाठी मालवाहतूक बुकिंग बिल त्याच्याकडे ठेवले.सीबीआयने २१ ऑगस्ट रोजी सापळा रचला आणि तक्रारदाराकडून ७ हजार २०० रुपयांची लाच स्वीकारताना आरोपीला रंगेहाथ पकडले. उपरोक्त आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.