इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
CBI ने तेलंगणा येथील वारंगल येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) प्रकल्प संचालक, PIU आणि एका खाजगी व्यक्तीला तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली.
सीबीआयने १९ ऑगस्ट रोजी प्रकल्प संचालक, PIU, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), वारंगल, तेलंगणा आणि एका खाजगी व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी हैदराबाद वारंगल महामार्ग, बीबीनगर, तेलंगणा येथील गुडूर टोल प्लाझा जवळ महामार्गालगत असलेल्या तक्रारदार रेस्टॉरंटच्या कामकाजात कोणताही अडथळा न आणता १ लाख रुपये मागितले. या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यता आला आहे.
वाटाघाटीनंतर, आरोपी प्रकल्प संचालकाने ६०,००० रुपये घेण्याचे मान्य केले आणि असे आश्वासन दिले की, प्रकल्प संचालक, पीआययू, एनएचएआय, वारंगल या पाच वर्षांच्या कार्यकाळात, तक्रारदाराला कोणतीही अडचण येणार नाही. सीबीआयने सापळा रचला आणि १९ ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना तक्रारदाराकडून ६० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हैदराबाद, वारंगल आणि सदाशिवपेट, तेलंगणा येथे ३ ठिकाणी झडती घेण्यात आली आणि गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.