इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने सहार एअर कार्गो कॉम्प्लेक्स, मुंबई येथे नियुक्त असलेल्या सीमाशुल्क अधीक्षकास १० लाख २० हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. ही रक्कम एका कस्टम्स हाउस एजंट (सीएचए) संस्थेकडून आयात मालाच्या मंजुरीस मदत करण्यासाठी मागितल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात सीबीआयने आरोपी व इतर अज्ञात सार्वजनिक अधिकारी तसेच खाजगी व्यक्तींविरुद्ध तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला. तक्रारीनुसार, आयात माल वेळेवर व अडथळ्यांशिवाय मंजूर करण्यासाठी आरोपीने फक्त स्वतःसाठीच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी देखील १० रुपये प्रति किलो दराने लाच मागितली होती.
तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्यानंतरही आरोपीने दबाव आणत धमकी दिल्याचेही आरोप आहेत. लाच न दिल्याने हेतुपुरस्सर माल रोखून ठेवल्याचाही आरोप आहे. या आरोपांची जुलै २५ ते ऑगस्ट १, २०२५ दरम्यान, स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान रेकॉर्डेड संभाषणे आणि अन्य भौतिक पुरावे लाच मागणीला दुजोरा देणारे ठरले. आरोपीने पुढीलप्रमाणे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असून, ६ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी (पीसीआर) सुनावण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.