नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्लीतील राऊस अव्हेन्यू जिल्हा न्यायालय संकुलातील न्यायिक नागरी विभाग-२ च्या कार्यकारी अभियंता (सी), यांना तक्रारदाराकडून ३० हजाराच लाच घेतांना अटक केली.
सीबीआयने २८ जुलै रोजी सदर आरोपीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला. कार्यकारी अभियंत्याने प्रलंबित बिलांचे पेमेंट करण्यासाठी लाच मागितली, म्हणजेच बिलांच्या एकूण रकमेच्या ३ टक्के कमिशन. तडजोड केल्यानंतर, आरोपी कार्यकारी अभियंत्याने तक्रारदाराकडून त्याचे प्रलंबित बिल फेडण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली.
सीबीआयने २८ जुलै रोजी सापळा रचला आणि आरोपी कार्यकारी अभियंत्याला तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागताना आणि स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दिल्ली आणि जयपूर येथे छापे टाकण्यात आले ज्यामध्ये १.६० कोटी रुपयांची रोख रक्कम तसेच मालमत्तेची कागदपत्रे, पुरेशी शिल्लक असलेले बँक खाते इत्यादी जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.