इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बंगळुरू येथील सीबीआय न्यायालयाने बेंगळुरू संचालनालयात (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, चेन्नई येथून प्रतिनियुक्तीवर) कार्यरत असलेले अंमलबजावणी संचालनालयाचे तत्कालीन अंमलबजावणी अधिकारी ललित बाजाद यांना एका खाजगी तक्रारदाराकडून बेकायदेशीरपणे ५ लाख रुपये मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
या कारवाईत त्यांना त्यांच्या व्यवसायाला आणि प्रतिष्ठेला बेकायदेशीर नुकसान पोहोचण्याची भीती दाखवून त्यांना कायदेशीर कारवाईत अडकवले होते.